कोपरगाव । तालुका प्रतिनिधी
आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopergoan Police Station) अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी किर्तनकार मधुसूदन महाराज यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, १५ ऑगस्ट रोजी रामगिरी महाराज यांनी प्रवचन चालू असताना समाजापुढे काही वास्तुस्थिती दाखवणारे विधानं केले त्यावरून आ. अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रध्दा दुखावल्या जातील असे विधान केले. तसेच दोन समाजात शत्रूत्व वाढेल व दोन्ही समाजात दंगा घडवुन आणण्याचे उद्देशाने तसेच त्यांचेतील एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशाने वक्तव्य केलेले आहे.
हे हि वाचा : “ए मिटकरी, तुझी पात्रता…”; भाजप नेत्याची अमोल मिटकरींवर शेलक्या शब्दात टीका
महाराष्ट्र तसेच देशातील हिंदु धर्मातील संत परंपरा व तिचे प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक ठेच पोहचवण्याचे काम केले आहे. तरी त्यांनी हिंदू संत व संन्याशी यांचा तसेच भगवे कपडे घालणाऱ्या साधू-संत यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली असून यामुळे संपुर्ण हिन्दू समाजाची भावना व श्रध्दा जाणीवपूर्वक दुखावली आहे. यामुळे फिर्यादी कीर्तनकार मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आ. अमोल रामकृष्ण मिटकरी यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो अकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे.
हे हि वाचा : संभाजी भिडे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का?; शरद पवारांचा संताप
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला घेराव
आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले. महंत रामगिरी महाराज यांच्या शिष्यगणानी शहर पोलीस ठाण्यास घेराव घातला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. गृह विभागाने तातडीने बैठक घेऊन महंत रामगिरी महाराज यांचेवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी परशुराम महाराज अनर्थे, मधुसूदन महाराज, दादा महाराज टुपके आदींसह उपस्थित भाविकांनी यावेळी केली.