Friday, October 2, 2026
HomeनाशिकNashik Crime News: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळेंविरोधात...

Nashik Crime News: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळेंविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

नाशिकरोड | प्रतिनिधी
उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वडनेर पाथर्डी रोडवरील राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये घुसून त्या शेतीतील फ्लावर पिकावर नांगर फिरवून तसेच संबंधित शेतकरी व त्याच्या पुतण्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याचे धमकी देणाऱ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे व त्यांच्या सहा ते सात साथीदाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सुरेश रुंजा बोराडे राहणार वडनेर पाथर्डी रोड सप्तशृंगी फार्म हाऊस जवळ पिंपळगाव खांब यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यात म्हटले आहे की मी व माझा पुतण्या योगेश बोराडे आमच्या शेतावर शेती करत असताना अचानकपणे शिवाजी पांडुरंग चुंभळे व त्यांचे सहा ते सात साथीदार शेतामध्ये घुसले, व मला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली, व मला शेतातून पळून लावले. पुतण्या योगेश बोराडे याला सुद्धा मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व त्याला सुद्धा तेथून पळून लावले. त्यानंतर त्यांनी शेतात असलेल्या फ्लावर पिकावर नांगर फिरवून शेती बळकविण्याचा प्रयत्न केला असेही तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

Jitendra Shelke Accident: हा अपघात घडवून आणला नाही ना, वाहनाचे ब्रेक फेल झाले होते की केले गेले होते? रोहित पवार, सुषमा अंधारे, मिटकरींना संशय

दरम्यान या तक्रारीनंतर उपनगर पोलिसांनी शिवाजी चुंभळे व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सपकाळे हे करत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....