Saturday, May 17, 2025
Homeधुळेधुळ्यात आईस्क्रीम पार्लरला आग, 40 लाखांचे नुकसान

धुळ्यात आईस्क्रीम पार्लरला आग, 40 लाखांचे नुकसान

धुळे । dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील साक्री रोडवरील कुमानगरात आईस्क्रीम पार्लरला (ice cream parlour) आज पहाटे भीषण आग (terrible fire) लागली. या आगीत दुकानातील (shop) साहित्य, (Material) फर्निचर व माल जळून खाक (burn up) झाले. यात सुमारे 40 लाखांचे नुकसान (damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात वित्तहानी झाली पण सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

अग्निउपद्रवाची माहिती कळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.तसेच वीज कंपनीने देखील ताबडतोब वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारण आईस्क्रीम पार्लर हे दुकानाशेजारी ओळीने दुकाने आहेत. पण सुदैवाने त्यांना हानी पोहचली नाही.

साक्रीरोडवरील सिंचन भवन समोरील रमेश बेकरीच्या मागील बाजूस राजेश बजरंगलाल अग्रवाल यांचे जस्ट चिल्ड नावाचे आईस्क्रीम पार्लर आहे. या दुकानाच्या वरच्या माळ्यावर अग्रवाल कुटुबिय राहतात. दिवाळीनिमित्त या आईस्क्रीम पार्लरमध्ये त्यांनी ईस्क्रीमसोबतच दिवाळीचा फराळ आणि इतर किराणा माल देखील भरला होता.

आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान तळमजल्यावरील दुकानाला भीषण आग लागली. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे लोळ आणि धुर यामुळे अग्रवाल कुटूंबियांची झोप उघडली. त्यांनी ताबडतोब महापालिकेच्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

वीज वितरण कंपनीने देखील वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र तोपर्यंत दुकान जळून पूर्णपणे खाक झाले होते. या आगीत अग्रवाल यांनी सुमारे 30 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आग लागल्यानंतर वेळीच अग्रवाल कुटुंबियांना जाग आल्याने आणि त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने जीवितहाणी टळली.

घटनेची माहिती मिळताच व्यापारी महासंघाचेे अध्यक्ष नितीन बंग, कुमारनगर शॉप किपर असोसिएशनचे प्रमुख सुरेश कुंदनानी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शहर पोलिस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कार-टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon नांदगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोखरी शिवारात भरधाव इर्टींगा कारने विरूध्द दिशेने जात मालवाहतूक करणार्‍या टेम्पोस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगाव, ता. निफाड...