नवी दिल्ली | New Delhi
हैदराबादमधील (Hyderabad) चारमिनारजवळ एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला आहे. अनेकजण साखरझोपेत असताना ही आग लागल्याची घटना घडली. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चारमिनार (Charminar) जवळच्या या इमारतीमध्ये भाडेकरूंचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात राहणाऱ्यांची संख्या असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अग्निशामन दलाने (Fire Brigade) आगीवर चार तासानंतर नियंत्रण मिळवले असून, सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.
Tragic, at least 8 people died, after a major #fire 🔥 broke out in a building at #GulzarHouse Road near #Charminar this morning today.
More than 10 fire engines reached the spot and the fire fighters 🚒 trying to douse the fire.
Police, fire… pic.twitter.com/AyAI6zy6JY
— Surya Reddy (@jsuryareddy) May 18, 2025
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर अग्निशामन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. पण आगीच्या तीव्रतेमुळे आणि धुरामुळे बचावकार्यात अडथळे आले. यानंतर चार ते पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तर आगीमध्ये गंभीर भाजलेल्या आणि दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना मदत
हैदराबादमधील आगीच्या या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले आहे. तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री घटनास्थळी
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी गुलजार हाऊस इथं घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात विलंब करत असल्याचा आरोप पीडितांनी केला. तसेच ते म्हणाले की, “अपघातात जीवित आणि वित्तहानी खूप मोठी होती. सरकारने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना योग्य उपकरणे आणि प्रशिक्षण द्यावे. अग्निशमन विभागाला त्यांचे तंत्रज्ञान सुधारण्याची गरज आहे. अशा दुर्घटना रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.” यासोबतच जखमींना चांगले वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना दिले.