Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गडावरील घाटात खाजगी प्रवासी बस जळून खाक

सप्तशृंगी गडावरील घाटात खाजगी प्रवासी बस जळून खाक

सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

सप्तशृंगीगड | इम्रान शहा

आज रात्री आठ वाजेच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर एका खाजगी प्रवासी वाहनाने अचानक पेट घेऊन प्रवासी बस जळून खाक झाली आहे.सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

- Advertisement -

सविस्तर व्रृत असे की खाजगी वाहन क्रमांक MH/04/GP/1645 हे प्रवासी वाहन १९ भाविकांना घेऊन शिर्डी येथून सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी घेऊन चालले होते. दरम्यान ह्या खाजगी बसने गडावरील घाटात वाहनाने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून बस मधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीत मात्र प्रवासी वाहन संपूर्ण जाळून खाक झाले.

YouTube video player

दरम्यान, ग्रामस्थांनी सदर आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. या बाबत कळवण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

सप्तशृंगी गडावर अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांचे कडून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...