Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : विनापरवाना फटाक्यांची वाहतूक; कंटनेर पकडला

Crime News : विनापरवाना फटाक्यांची वाहतूक; कंटनेर पकडला

एमआयडीसी पोलिसांकडून 32 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर धडक कारवाई करत फटाके, कंटेनर व टेम्पो असा मिळून तब्बल 32 लाख 6 हजार 343 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. निंबळक बायपास रस्त्यावरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळील टी.एन. 29 सी.यु. 1266 या क्रमांकाच्या कंटेनरमधून एक इसम फटाक्यांची विनापरवाना वाहतूक करत आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती होती. त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून सापळा रचत तेथे छापा टाकला असता, टेम्पो (एमएच 16 सीडी 5792) मध्ये कंटेनरमधून फटाके उतरत असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

सदर कंटेनरमधून मिळालेल्या स्फोटक फटाक्यांची चौकशी केली असता चालक सुरेशकुमार वेलस्वामी (वय 35 रा. पारामती वेल्लुर, तामिळनाडू) याच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी किंवा कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत किरण संजय खामकर (रा. इसळक, ता. अहिल्यानगर) याचा सहभागही निष्पन्न झाला आहे. या दोघांकडून कंटेनर, टेम्पो व स्फोटक पदार्थ असा एकुण 32 लाख 6 हजार 343 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेतील संशयित आरोपींविरोधात विनापरवाना फटाके बाळगणे, वाहतूक करणे आणि सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या जिवाला धोका पोहोचेल अशा विविध कलमान्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) अमोल भारती, सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद परदेशी व मनोज मोंढे, अंमलदार खेडकर, पितळे, सचिन आडबल, राजू सुद्रीक, किशोर जाधव, मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...