Saturday, April 26, 2025
Homeनाशिकमालेगावात माजी महापौरांवर गोळीबार; हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार; हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

शहर तालुक्यात गोळीबार (Firing) घटनांचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं शहर हादरले आहे. रविवारी (दि.२६) रात्री उशिरा एमआयएमचे पदाधिकारी व माजी महापौर अब्दुल मलिक (Abdul Malik ) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापौर अब्दुल यात गंभीर जखमी झाले आहेत. रात्री त्यांना प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिक (Nashik) येथे हलवण्यात आले असून अधिक उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मुंढेगावात बेकायदा घोडा बैल शर्यत आयोजित करणे भोवले; उपसरपंचासह सदस्यांवर गुन्हा

याबाबत अधिक माहिती अशी की, अब्दुल हे जुना आग्रा रोडवर वरून दुचाकीने जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल (MLA Maulana Mufti Ismail) यांच्यासह पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक तेगाबिर सिंग संधू यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अब्दुल यांना उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. काहीकाळ तणावाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रशासन सतर्क झाले आहे.

हे देखील वाचा : राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; यंदाही मुलींची बाजी

दरम्यान, तालुक्यातील झोडगे गावाजवळ (Zodge Village) पेट्रोल पंपावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शहरात थेट माजी महापौरांवर गोळीबार झाल्याच्या घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी पोलीस (Police) प्रशासनावर संताप व्यक्त करीत टीका केली. शहरात सध्या जंगल राज सुरू असून माजी महापौरांवर जीवघेणा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांच्या जीवाचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गोळीबार घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळव्यात अशी मागणी त्यांनी केली. या गोळीबाराचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान एकापाठोपाठ होत असलेल्या गोळीबाराच्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...