Tuesday, January 6, 2026
Homeक्रीडाIPL 2024 : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज पहिला क्वालिफायर सामना

IPL 2024 : हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात आज पहिला क्वालिफायर सामना

कोण मारणार मैदान?.

मुंबई | Mumbai

आयपीएलचा २०२४ (IPL 2024) च्या हंगामातील साखळी फेरीच्या सामन्यांचा थरार आटोपला असून आजपासून (दि.२१) बाद फेरीच्या लढतींना सुरुवात होत आहे. यामध्ये पहिला क्वालिफायर सामना (Qualifier Match) सनरायझर्स हैदराबाद विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून या सामन्यात विजय संपादन करून चौथी अंतिम फेरी गाठण्याची संधी कोलकात्याच्या संघाकडे असणार आहे. तर तिसऱ्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी हैदराबादचा संघ उत्सुक असणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या हंगामात कोलकात्याचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) तर हैदराबादची धुरा पॅट कमिन्सकडे ( Pat Cummins) आहे. या दोन्ही संघांनी अव्वल दोन संघामध्ये आपले स्थान निश्चित केल्यामुळे अंतिम सामन्यात खेळण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन संधी असणार आहेत. साखळी फेरीतील १४ सामन्यात कोलकात्याच्या संघाने २० गुणांसह अव्वल तर हैदराबादच्या संघाने १ अनिर्णित सामन्यासह १७ गुणांनी दुसरे स्थान निश्चित केले होते. त्यांनतर आता या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.

YouTube video player

दरम्यान, साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी कोलकात्याच्या (Kolkata)संघाने ९ सामन्यात विजय मिळविला होता तर ३ सामन्यात पराभव झाला आहे. याशिवाय २ सामने अनिर्णित राहिले आहेत. तर हैदराबादने (Hyderabad) १४ पैकी ८ मध्ये विजय ५ पराभव आणि १ सामना अनिर्णित राहिला होता. तसेच आयपीएल २०२४ च्या पहिल्या साखळी सामन्यात कोलकात्याने घरच्या मैदानावर हैदराबादविरुद्ध ४ धावांनी थरारक विजय संपादन केला होता. त्यानंतर आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हैदराबाद सज्ज असणार आहे.

सलिल परांजपे , नाशिक

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...