Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु; Video Viral

मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरु; Video Viral

मुंबई | Mumbai
रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा रायगड समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बोटीवर असलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बोटीला अपघात कसा झाला? तसेच त्यावर किती खलाशी होते? याची माहिती अद्याप समोर आली नाही. बोट बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रायगडमधील उरण या भागात ही बोट दुर्घटना झाली आहे. ही बोट गुजरातच्या हद्दीतील मासेमारांची आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे. या बोटीचा आता शोध घेतला जात आहे. ही बोट अजूनही मिळालेली नाही. समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये काही मच्छीमार होते. या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

- Advertisement -

मात्र, अपघात कशामुळे झाला, बोटीवर किती खलाशी होते? जिवीत हानी आहे का? किती नुकसान झाले? याबाबत काही खुलासा झालेला नाही. वादळी हवामानामुळे मासेमारी बंदी असतानाही सदरची बोट समुद्रात कशी आली याची माहिती समोर आलेली नाही. ही बोट गुजरातची आहे.

YouTube video player
रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्य परवाना विभाग,कस्टम, पोलिस यांनी सदर घटनेसंदर्भात जातीने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी कोळी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही बोट बुडत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बोटीमध्ये पाणी शिरले त्यानंतर संपूर्ण बोट समुद्रात बुडू लागली. बोट बुडत असल्यामुळे त्यावर असलेल्या सर्व खलाशांनी समुद्रामध्ये उडी मारली. हे खलाशी समुद्रामध्ये पोहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अलिबागमध्ये घडली होती. या बोट दुर्घटनेत एकूण तिघांचा मृत्यू झाला होता तर सहा जाणांना वाचवण्यात यश आले होते. सध्या समुद्र उधाणलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत माच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असते. मात्र तरीदेखील आदेश झुगारून काही मच्छीमार मासे पकडायला समुद्रात जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...