पिंपळनेर Pimpalner। वार्ताहर
येथील पोलीस ठाण्यात जवळील (police station) सामोडे घोड्यामाळ भागातील (Samode Ghodymal area)गट नंबर 947 मधील पाचशे अतिक्रमीत घरांना (Five hundred encroached houses) शासनाने (government) दहा दिवसात घरे खाली करण्याचे आदेश (Orders to demolish houses)दिले आहेत. खाली न केल्यास बुलडोझर फिरविण्याचाही इशारा (Also warning to turn the bulldozer) दिला आहे. याबाबत रिक्षावरून आवाहनही करण्यात आले. त्यामुळे जनआक्रोश उफाळून आला. संतप्त नागरिकांनी (angry citizens) आज आ.मंजुळा गावित यांच्या कार्यालयावर मोर्चाने येत रस्त्यावर (Protest on the streets) ठिय्या आंदोलन केले.
पिंपळनेर शहराला लागून सामोडा चौफुली जेबापूर रोड, वैदुवाडी ते दुबई भिलाटीपर्यंत घोड्यामाळ भागातील नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता वैदुवाडीत व सामोडा चौफुलीवर गणेश झेरॉक्स जवळ अतिक्रमणची यादी जाहीर करण्यात आली. दहा दिवसाच्या आत हे अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा बुलडोझरने घरे उध्वस्त करण्यात येतील असे रिक्षावरून आवाहन करून प्रशासनाने केले.
त्यामुळे जनतेमध्ये एकच घबराट पसरली. 20 ते 25 वर्षापासून निवासी राहणारी जनता रस्त्यावर उतरली. यात महिला, पुरुष मोठ्या संख्येने होते. जन आक्रोश निर्माण होऊन घोड्यामाळवरून या संतप्त नागरिकांनी रामनगर भागातील आ. मंजुळा गावित यांच्या कार्यालयासमोर मोर्चा नेला. रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. हजारो नागरिक यावेळी रस्त्यावर आपला आक्रोश व्यक्त करीत होते.
आम्हाला नवीन घर करणे शक्य नाही, असे सांगितले. यावेळी मोर्चाला सामोरे येत आ.मंजुळा गावित यांनी मला जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन तयार करून द्या. मी आपल्या भावना पोहोचवून मार्ग निघतो का, यासाठी प्रयत्न करते, असे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकर्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. उद्या येथील नागरिक जिल्हाधिकार्यांनाही आपले निवेदन देणार आहेत.
तसेच आ.मंजुळा गावित यांनाही निवेदन देण्यात येणार आहेत. प्रशासनाने आम्हाला आढविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही आमरण उपोषण करू, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. यावेळी भटू पवार, ग्रा.पं.सदस्य सागर पानपाटील, संभाजी अहिरराव, गौतम पवार आदींनी व्यथा मांडल्या. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. आ.गावित यांच्या आश्वासनानंतर मोर्चेकरी घराकडे निघाले.