Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik and Dindori Constituency : मतमाेजणीसाठी पाचशे पाेलिस ऑनड्युटी

Nashik and Dindori Constituency : मतमाेजणीसाठी पाचशे पाेलिस ऑनड्युटी

एसआरपीएफ, सीआरपीएफ, क्युआरटीची नजर, परवानगीशिवाय प्रवेश नाहीच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा (Nashik and Dindori Loksabha) निवडणुकीची मतमोजणी येत्या चार जून रोजी अंबड येथील वेअर हाऊसमध्ये होणार आहे. अतिशय उत्सुकता लागलेल्या या निकालाची जिल्हावासीय व कार्यकर्ते वाट पाहून आहेत. त्यामुळे या मतमोजणी दरम्यान, राजकीय सुंदोपसुंदी, वाद उद्भवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ, नये यासाठी मतमोजणी केंद्रासह बाहेरील परिसरात पाचशेहून अधिक सशस्त्र पोलीस तैनात असणार आहे. यासह परवानगी आणि प्राधिकार पत्र बाळगणाऱ्यांना मतमोजणी केंद्राभोवती प्रवेश असणार आहे.

- Advertisement -

२० मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघांसाठी मतदान पार पडले. यानंतर, व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट चोख बंदोबस्तात अंबड येथील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. तसेच तेव्हापासून या ठिकाणी २४×७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून बाहेरील पोलीसांसह सशस्त्र दलाच्या तुकड्या, वरिष्ठ अधिकारी तैनात आहेत. दर, दोन तासांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षेचा आढावा शहर पोलीस घेत आहे.

त्यातच, चार जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ती शांततेत होण्यासाठी शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, वाहूतक व मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांच्या निर्देशांनुसार सर्वच सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मतमोजणी बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे.

त्यानुसार, परिमंडळ दोनच्या अखत्यारितील सातपूर, अंबड, एमआयडीसी पोलीस चौकी, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कँम्प आणि पोलीस मुख्यालयासह गुन्हेशाखा, अभियोग कक्ष, आर्थिक गुन्हेशाखा, गुंडाविरोधी पथक, महिला सुरक्षा विभाग, टीएडब्लू, वाहतूक शाखा, विशेष शाखांचे पोलिस निरीक्षक, अंमलदार, साध्या वेशातील पोलीस स्ट्राँगरुमसह मतमोजणी कक्ष, अंबड वेअर हाऊस येथे तैनात असणार आहेत.

असा असेल बंदोबस्त

सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या
तीन स्ट्रायकिंग फोर्स (एकूण ३० अंमलगार)
एटीएसचे अधिकारी, क्युआरटी, आरसीपी आणि अग्निश्मन दल
सकाळी सात वाजेपासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत बंदोबस्त

तैनात अधिकारी

पोलीस आयुक्त
उपायुक्त-४
सहायक आयुक्त-८
पोलीस निरीक्षक -१५
एपीआय/पीएसआय-३३
अंमलदार-२५५
महिला अंमलदार-१००

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या