Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Accident News : नवीन कसारा घाटात भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू,...

Nashik Accident News : नवीन कसारा घाटात भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway) नवीन कसारा घाटातील (New Kasara Ghat) बलगर पॉइंटजवळ दूध टँकरचा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू (Death) झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळून सदरचा अपघात झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासनाचा चोख बंदोबस्त

YouTube video player

यावेळी घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे. तसेच हायवे पोलीस आणि NHAI चे समीर चौधरी, सुरज आव्हाड, सचिन भडांगे, शिवा कातोरे, देविदास म्हसणे, संदीप म्हसणे, आणि रुग्णवाहीका टीमने दोरीच्या साहाय्याने दरीत उतरून ४ गंभीर जखमींना दरीतून बाहेर काढले आहे. तर अजूनही तीन ते चार जण दरीत अडकल्याचा अंदाज आहे.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “त्यांच्याकडे आता कुणी…, शांतता रॅलीत फक्त…”; भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका

दरम्यान, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर यांनी जखमींना इगतपुरी आणि कसारा (Igatpuri and Kasara) येथे ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले आहे. या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे.

या अपघातात जखमी पैकी

१) अक्षय विजय घुगे वय तीस वर्षे राहणार निमोन तालुका संगमनेर २) श्लोक जायभाय वय पाच वर्ष राहणार नालासोपारा ३) अनिकेत वाघ वय 21 वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर ४) मंगेश वाघ वय पन्नास वर्षे राहणार निहळ तालुका सिन्नर हे जखमी असून त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले.

तर मृतामध्ये १) विजय घुगे वय साठ वर्ष राहणार निमोण तालुका संगमनेर २) आरती जायभाय व 31 वर्ष राहणार नालासोपारा ३) सार्थक वाघ वय 20 वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर ४) रामदास दराडे वय पन्नास वर्ष राहणार निहळ तालुका सिन्नर व चालक 5) योगेश आढाव राहणार राहुरी या पाच व्यक्ती मयत झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....