Wednesday, March 26, 2025
HomeनाशिकNashik News : सिटीलिंक बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार

Nashik News : सिटीलिंक बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुरडी ठार

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील मालधक्का रोडच्या पाठीमागे व गाडेकर मळा परिसरात असलेल्या सिटीलिंक बस (Citilink Bus) डेपोच्या आवारात सिटीलिंक बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच वर्षीय चिमुरडी ठार (Killed) झाली आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने सिटीलिंक बस व्यवस्थापनाला धारेवर धरले. तर अपघात करून बस चालक फरार झाला असून संबंधित बस चालक हा दारू पिलेला असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केलेला आहे. दरम्यान यावेळी जमावाने बस फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच सदरचा प्रकार हा ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सानू सागर गवई (वय-५) रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर रेल्वे माल धक्का,नाशिकरोड असे अपघातात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. सानू ही इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून शाळेतून आजोबासोबत घरी जात असताना सिटी लिंक बस डेपोच्या आवारात एमएच १५ जी. व्ही. ७७१९ या क्रमांकाच्या बसची तिला धडक बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातानंतर (Accident) बस चालक हा फरार झाला असून सदरची घटना समजताच आजूबाजूच्या व माल धक्का परिसरात असलेल्या कामगारांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक नागरिक व कामगारांनी डेपो व्यवस्थापनाला धारेवर धरून याप्रकरणी जाब विचारला. सदर बसचालक कुठे फरार झाला? व त्याला लपून ठेवले आहे का? असा सवाल तेथील नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी संतप्त झालेल्या काही युवकांनी बस फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

भरपाई देण्याची मागणी

या अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचे कुटुंब अतिशय गरीब असून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते भारत निकम, रामबाबा पठारे तसेच राजाभाऊ वानखेडे यांनी केली.त्याचप्रमाणे या अपघात प्रकरणी तातडीने बस चालकाला अटक करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...