Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशसिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरामुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर सिक्कीममध्ये गुरुवारी मुसळधार पावसाने थैमान घातले. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून महापुराची स्थिती निर्माण झाली आहे…

- Advertisement -

पेगोंग येथील राष्ट्रीय महामार्ग 10 पाण्याखाली गेला आहे. लाचेन आणि लाचुंग सारख्या क्षेत्रांशी संपर्क तुटला आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे महामार्गावरील पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाले आहे.

Cyclone Biparjoy : गुजरातमध्ये ‘बिपरजॉय’चे थैमान, राजस्थानमध्ये हाय अलर्ट

गंगटोक-नाथुला मार्गाच्या जेएन रोडसह 13व्या मैल आणि थुलो खोला, रेल खोला येथे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे येथील रस्ते बंद आहेत. रस्ते पूर्ववत करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भारतातून बँकॉकला जाता येणार बायरोड; कधीपासून सुरु होणार महामार्ग?

- Advertisment -

ताज्या बातम्या