Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधलवचिक व्यक्तिमत्व

लवचिक व्यक्तिमत्व

तुमचे बहुतांश व्यक्तिमत्व हे तुम्ही अजाणपणेच तयार केलेले असते. त्यामधला अगदी छोटासा भाग कदाचित जाणीवपूर्वक तयार केला असू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व निर्माण करता, तेव्हा एका दृष्टीने त्याचा अर्थाने असा होतो की, सृष्टीकर्त्याने तुमची योग्यप्रकारे तुमची घडवणूक केली नाहीये.

जर तुम्हाला यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे वाटत असेल, तर निश्चितपणे तुमच्यानुसार, सृष्टीकर्त्याने तुमची योग्यरीत्या घडवणूक केली नाहीये. तर ही भव्य – खरोखर एक अदभूत सृष्टी – ही परिपूर्ण नाही असे तुम्हाला का वाटते? हे आपल्या उपजत स्व-संरक्षणाच्या सहज प्रवृत्तीमुळे असे घडते. ही अगदी प्राथमिक, आधारभूत प्रक्रिया प्रत्येक पेशीमध्ये उपजत प्रस्थापित आहे.

- Advertisement -

प्रत्येक कृमी-कीटकामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये ही प्रक्रिया अभिप्रेत आहे. मानावामध्ये देखील आहे. पण अडचण केवळ एवढीच आहे की, स्व-संरक्षणाची ही प्रक्रिया कुठवर थांबवायची. ह्या प्रक्रियेने स्वतःला तुमच्या आयुष्याच्या एकूणएक सर्वच क्षेत्रात पसरवले आहे, म्हणून तुम्ही स्वतःचे एक छोटेसे व्यक्तिमत्व निर्माण केले आहे, जे सतत तुमचा बचाव करत असते. जपण्याजोगी एकमात्र गोष्ट म्हणजे तुमचे शरीर.

तुमच्या व्यक्तिमत्वाला स्व-संरक्षणाची गरज नाही. जरी आम्ही त्याला रोज मारबडव केलीत, तरी त्याला कोणतीच इजा होणार नाही. पण व्यक्तिमत्त्वाशिवाय तुम्ही इथे जगू शकत नाही. इथे जगण्यासाठी एक व्यक्तिमत्व जोपासणे गरजेचे आहे, बाह्य जगातील व्यवहार करण्यासाठी, दैनंदिन कार्ये; व्यवहारासाठी, आयुष्यातील परिस्थिती, गोष्टी हाताळण्यासाठी वगैरे. जर ते लवचिक असेल तर, वेगवेगळ्या ठिकाणी, परिस्थितीनुसार तुम्ही योग्य ते व्यक्तिमत्व धारण करू शकता, असे असेल तर काहीच हरकत नाही.

पण सध्या ते जणू दगडासारखे आहे. जे तुमच्या डोक्यावर एका भल्या मोठ्या ओझ्याप्रमाणे सतत बसलेलं असतं. त्याच्या आवडी-निवडींच्या कक्षेत न बसणार्‍या सर्व गोष्टींचा तुम्हाला सतत जाच सहन करावा लागतो.

तर मी असे ज्याला तुम्ही संबोधता या व्यंगचित्राचा चित्रकार कोण आहे? निःशंकपणे हे तुम्हीच तयार केले, परंतु तुमच्या अवतीभोवतीच्या अनेक लोकांपासून तुम्ही प्रभावित झालेले आहात. जेव्हा तुम्ही 15-16 वर्षांचे होता, एखादा चित्रपट बघितला आणि तुम्हाला जर तो खरंच आवडला, तर अजाणतेपणी तुम्ही त्यातील नायका प्रमाणेच चालणे, बोलणे करत होतात, हो ना? कधीतरी कदाचित तुम्ही ते जाणीवपूर्वक केले असेल, पण बहुतेकदा ते अजाणतेपणे घडले. तर हे व्यंग्यचित्र अस्तित्वात आले ते तुम्ही गोळा केलेल्या अशा अनेकप्रकारच्या लहानसहान गोष्टींमधून.

तुमच्या मदतीशिवाय ते एक दिवस सुद्धा तग धरू शकत नाही. सदासर्वदा तुम्ही त्याला आधार देत राहिलं पाहिजे. तर ह्या संदर्भात ध्यान म्हणजे, एका प्रकारे तुम्ही तुमच्या या व्यक्तिमत्त्वाचा आधार काढून टाकत आहात. अचानकपणे ते कोसळते. आणि मग तेथे फक्त उपस्थिती आहे, प्रत्यक्ष ती व्यक्ती नाही.

जीवनामार्फत तुम्हाला एक अमर्याद शक्यता दिली गेली होती. पण स्वतःला या छोट्याशा व्यक्तीमत्वात उभारून तुम्हाला तुम्ही विकृत करून टाकलं आहे, तुम्ही स्वतःची पार दुर्दशा केली आहे.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत.सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या