Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलासलगाव : शिवनदीला पूर

लासलगाव : शिवनदीला पूर

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

लासलगावसह परिसरातील गावांना शनिवारी रात्रीपासून रविवारी पहाटे सात वाजेपर्यंत पावसाने झोडपून काढले. रात्रभर कोसळलेल्या जोरदार पावसामुळे येथील शिवनदीला या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे.

YouTube video player

निमगाव वाकडा येथील बंधाऱ्यावर खडकावरून पाणी पडत असताना नदीपात्रात तयार झालेला नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. अनेकांनी हे सुंदर दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.

शनिवारी संध्याकाळी सुमारे सात वाजता सुरू झालेला पाऊस रविवारी पहाटेपर्यंत अखंडपणे सुरू राहिला. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पर्जन्यमापक यंत्रावर तब्बल 61 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 37 इंच 47 सेंटीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा सुमारे 16 इंच जास्त पाऊस पडल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली .

रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे कांदा आणि द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . आधीच संकटग्रस्त असलेल्या बळीराजावर आर्थिक ताण वाढला असून, “शेती करावी कशी आणि घेतलेले कर्ज फेडावे कसे?” असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

पिंपळगाव नजीक लासलगाव–पाटोदा रोडवरील रोहित सुभाष सोनवणे या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेत तळ्याचे स्वरूप धारण झाले आहे. पाण्यामुळे विहिरीत गाळ साचून विहिरीचेही मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने दीपावलीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल असे आश्वासन दिले होते, मात्र दीपावली उलटून पाच दिवस झाले तरीही शासकीय मदत मिळाली नाही, अशी खंत शेतकरी सोनवणे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

Nashik News : पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद (Zilla Parishad) स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर...