Friday, September 20, 2024
Homeनाशिकगिरणा नदीला पूर

गिरणा नदीला पूर

- Advertisement -

पाळे खुर्द । वार्ताहर Pale Khurd

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने परिसरातील हिंग ओहळ, लेंडी नाला, मशाड नाला, वाघ ओहळ, उंबर ओहळ आदी ओहळ पाणी वाहू लागल्याने बरोबरच गिरणा नदीलां पूर आला आहे.

गेल्या दोन महिने जून व जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने गिरना नदी पात्रासह संपूर्ण नाले व ओहळ कोरडे झालेले दिसत होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच वरुण राजाने हजेरी लाऊन संपूर्ण परिसर जलमय केल्याने बळीराजा सुखावला आहे.

दोन महिन्यांचा अनुशेष ऑगस्ट महिन्यात भरून निघाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. आता पडलेल्या पावसामुळे भू गर्भातील जल पातळीत समतोल राखला जाऊन रब्बी हंगामात विहिरींना पाणी उतरले जाणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पहायास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या