Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतराचे आदेश

दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतराचे आदेश

ना. नरहरी झिरवाळ, कैलास मवाळ यांच्या प्रयत्नांना यश

- Advertisement -

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विशेष प्रयत्नांने आठ एकर जागा हस्तांतराचा आदेश निघाला असून त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती दिंडोरीचे माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी दिली. जागा मंजूरीमुळे उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे दिंडोरीत आरोग्य सेवेला बळ मिळणार आहे.

दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ग्रामीण रुग्णालयावर मोठा ताण पडायचा. त्यानंतर उपचारासाठीही गर्दी होत असते. अनेक सोयीसुविधा दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे सुध्दा दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात तालुक्याचे ठिकाण असूनही आलेला रुग्ण नाशिकला पाठवला जात असतो. आजही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातून अनेक रुग्ण नाशिकला पाठवले जातात. सर्व सामान्य रुग्णांना नाशिकला जाणे परवडणारे नसते. म्हणूनच दिंडोरी येथे उपजिल्हा रुग्णालय ना. नरहरी झिरवाळ यांनी मंजूर केले होते. सध्याची जी जागा आहे ती जागा रुग्णालयासाठी अपुरी आहेत.

सध्याच्या रुग्णालयात वेगवेगळ्या व्यवस्था केल्या असल्या तरी रुग्णांना पुरेसे बेड नाही. वेगवेगळ्या कक्ष उपलब्ध नाहीत. १०० खाटांचे रुग्णालय उभे करायचे म्हटले तर जागा पुरणार नव्हती, म्हणून कृषी विभागाच्या नाशिक – वणी रस्त्यावरील जागेचा विचार सुरु झाला होता. ना. नरहरी झिरवाळ यांनी या जागेसाठी पाठपुरावा केला. कैलास मवाळ यांनी वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न केले. दि. १ नोव्हेंबर २०२५ च्या शासनाच्या आदेशानुसार कृषी विभागाच्या अखत्यारीतील तालुका फळ रोप वाटिका येथील गट क्र. १०२५ ते १०२८ व १०३० चे एकुण क्षेत्रापैकी ८ एकर जमिन श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाकरीता सार्वजनिक आरोग्य विभागास हस्तांतरीत करण्यासाठी महसूल विभागाकडे आदेश दिले होते.

सदर जमिनीचे आरेखन करुन व मोजणी करुन जमिन हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार मंडल अधिकार्‍यांनी अहवाल व मोजणी नकाक्षा सादर केला. आता अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी सदर जागा उपजिल्हा रुग्णालयास हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिली आहे. सदर जागा ही भविष्यात आरोग्य विभागाला हस्तांतरीत किंवा विक्री करता येणार नाही. जमिन आरक्षणाबाबत तहसिलदार दिंडोरी हे खात्री करुन निर्णय घेतील व नंतर जमिनीचा ताबा देतील. याबाबतचे आदेश उप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी काढले आहे.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...