Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशआर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर : ८.५ टक्के विकास दराचा अंदाज

आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर : ८.५ टक्के विकास दराचा अंदाज

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार सरकारला ८ ते ८.५ टक्के विकास दराचा अंदाज आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना निर्मला सितारमण यांनी कोरोना महामारीपासून या काळात राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. शेतकरी, महिलांपासून ते तिहेरी तलाकपर्यंतच्या मुद्द्यांचा त्यांच्या भाषणात समावेश होता.

- Advertisement -

कृषी क्षेत्रात ३.९ टक्के वाढ

आर्थिक पाहणी अहवालात नव्या आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के जीडीपी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सेवा क्षेत्रात वाढीचा दर हा ८.९ टक्के राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.येत्या महागाईचा दर नियंत्रणात राहील असं सांगितलं असलं तरी बाहेरून आयात करण्यात येणाऱ्या मालामुळे महागाईवर प्रभाव पडेल असं सांगण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रात ३.९ टक्के वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. तर उद्योग क्षेत्रात ११.८ टक्क्यांची वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या