Friday, May 3, 2024
Homeनगरअन्न प्रशासनाचे छापे

अन्न प्रशासनाचे छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील पानटपर्‍यांवर छापे टाकून विक्रीस प्रतिबंध असलेला मावा जप्त करून संबंधित टपर्‍या सील केल्या आहेत.

- Advertisement -

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्यासह पथकाने गेल्या दोन दिवसांमध्ये ही कारवाई केली. शहरातील पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकात असलेल्या प्रकाश हनुमंत अमृतवाड याच्या मयून पानस्टॉलवर छाप टाकून पथकाने एक हजार 980 रुपयांचा मावा जप्त केला.

तसेच दिल्लीगेट येथील अमोल मदन सदाफुले, केडगाव येथील निळकंठ शशिकांत काळे, नासीर अकबर पठाण, भिस्तबाग रोडवरील संतोष हौसाराम केदारे, सुनील सुरेश धनगर, सुरेश शंकर शिंदे यांच्या पानटपर्‍यांवर छापा टाकून मावा जप्त केला. या आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या पानटपर्‍या सील केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या