Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रदिलासा! राज्यात दोन वर्षांत पहिल्यांदाच करोना रुग्णसंख्या शंभरच्या खाली

दिलासा! राज्यात दोन वर्षांत पहिल्यांदाच करोना रुग्णसंख्या शंभरच्या खाली

मुंबई | Mumbai

राज्यात करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत कमालीची घट झाली आहे. आता करोनाची तिसरी लाट जवळजवळ पुर्णपणे ओसरली आहे. गेल्या २४ तासात करोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी दोन वर्षांत पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली आहे….

- Advertisement -

राज्यात केवळ ९७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. १९ ठिकाणी एकही नव्या करोना रुग्णाची नोंद झाली नाही. ही रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेतील (Corona Third Wave) सर्वात कमी आहे.

यापूर्वी पहिल्या लाटेच्या (Corona First Wave) सुरुवातीला राज्यात २ एप्रिल २०२० रोजी ८८ करोनाबाधित आढळले होते. मागील दोन वर्षांपासून राज्यात करोनाने (Corona) हाहाकार माजवला होता. मात्र आता करोना रुग्णांच्या संख्या आटोक्यात आली आहे.

राज्यात सक्रीय रुग्ण किती?

शनिवारी राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या एक हजार 525 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात 518 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईत 315, ठाणे 166, अहमदनगरमध्ये 144 सक्रीय रुग्ण आहेत. नाशिकमध्ये ७२ सर्क्रीय रुग्ण तर धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही. तर पालघर 9, रन्नागिरी 4, सांगली 7, जळगाव 4, नंदूरबार 1, जालना 1, परभणी 9, नांदेड 9, उस्मनाबाद 6, अमरावती 4, अकोला 3, वाशिवाम 3. वर्धा 1, भंडारा 1 चंद्रपूर 3 आणि गडचिरोलीमध्ये सात सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या