Saturday, May 24, 2025
Homeधुळेफागण्यात नोटीस न बजवता सक्तीने वीज बिलांची वसूली

फागण्यात नोटीस न बजवता सक्तीने वीज बिलांची वसूली

धुळे Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

फागणे-बाळापूर गावात महावितरणातर्फे (MSEDCL) सक्तीने (Forced recovery) वीज बिल (electricity bills) वसुली केली जात आहे. वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता(without giving notice) वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. सहाय्यक अभियंता आशिष कासार (Assistant Engineer Ashish Kasar) हे अर्वाच्च भाषेत बोलून ग्रामस्थांचा मानसिक छळ करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यासाठी नगरसेवक संजय पाटील व फागणे ग्रामस्थांनी निदर्शने केली.

फागणे-बाळापूर गावात विद्युत महावितरणातर्फे सक्तीने वीज बिल वसुली केली जात आहे. विज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येत असून वीज ग्राहकांना कुठलीही नोटीस न बजावता कारवाई करण्यात येत आहे.सहाय्यक अभियंता आशिष कासार हे विज ग्राहकांना अर्वाच्च भाषेत बोलून मानसिक त्रास देवून संबंधित ग्राहकांचे वीज कनेक्शन देखील कट करीत आहेत. घरात कर्ता पुरुष नसतांना अर्वाच्च भाषेत बोलून सहाय्यक अभियंता कासार पठाणी वसुली करीत आहेत. असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सहायक अभियंता कासार यांची तात्काळ बदली करण्यात यावी. अशी मागणी नगरसेवक संजय पाटील यांच्यासह बाळापुर व फागणे ग्रामस्थांनी केली आहे.

कोरोनाच्या गंभीर अशा परिस्थीतीत सर्वत्र आर्थिक चक्र थांबले असतांना फागणे येथील विद्युत महावितरण विभागाकडून वीज देयक भरण्यासाठी सहाय्यक अभियंता आशिष कासार यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास दिला जात आहे. तसेच बाळापूर गावात डीपी जळत असल्याने शाळेकरी मुलासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा समस्या सांगायला गेल्यावर कासार गावातील गुंड लोकांची धमकी देऊन दादागिरीची भाषा करतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी समस्या कोणाकडे मांडावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभियंता कासार यांची फागणे गावातून तात्काळ बदली करण्यात यावी. त्यांच्या जागेवर सक्षम अधिकार्‍यांची नेमणूक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक संजय पाटील यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

इंग्लंड

ENGvsIND Team Squad: मोठी बातमी! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा;...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्याला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या इंग्लंड दौऱ्यात एकूण ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे....