Thursday, May 23, 2024
Homeनगरविदेशी दारूचा मोठा साठा एलसीबीने पकडला

विदेशी दारूचा मोठा साठा एलसीबीने पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवा राज्यातून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला विदेशी दारूचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे. 12 लाख 44 हजाराची दारू व 15 लाखाचा टेम्पो असा एकुण 27 लाख 44 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

नगर कल्याण रस्त्यावर नेप्ती नाका येथे आज (बुधवारी) ही कारवाई केली. याप्रकरणी बाबु लखुभाई राठोड (वय 25 रा. गुजरात) व सिध्देश संदीप खरमाळे (वय 26 रा. भांडगाव ता. पारनेर) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, संतोष लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या