Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशयुक्रेनमधून शिक्षण सोडून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली 'ही'...

युक्रेनमधून शिक्षण सोडून परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केली ‘ही’ घोषणा

दिल्ली | Delhi

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात तुफान युद्ध सुरू आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेऊन डॉक्टर (Doctor) होऊन भारतात परतण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी बनले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) महत्वाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) शुक्रवारी एक परिपत्रक जारी करून परदेशी वैद्यकीय पदवीधरांना (Foreign medical graduates) करोना विषाणू (COVID19) तसेच युक्रेनमधील युद्ध यांसारख्या त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे अपूर्ण इंटर्नशिप (internships in India) देशात पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गायक आदित्य नारायणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

आयोगाने सांगितले की, जर उमेदवारांनी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (Foreign Medical Graduate Examination) (FMGE) उत्तीर्ण केली असेल तर इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अर्जावर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे प्रक्रिया केली जाऊ शकते.

सध्याच्या तरतुदीनुसार, परदेशी विद्यापीठांतून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागते. त्यानंतर त्यांना भारतीय मेडिकल ग्रॅज्युएट समकक्ष म्हणून मान्यता मिळते. त्यामुळे भारतात त्यांना प्रॅक्टिस करता येते.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स… १६५ वर्षांचा कलेचा वारसा

तथापि, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दुसर्‍या वैद्यकीय महाविद्यालयात मायग्रेशनची परवानगी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमात नाही. त्यामुळे युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न गंभीर बनला होता.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

- Advertisment -

ताज्या बातम्या