मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यातील (Beed District) शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) बावी येथील एका व्यक्तीस भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांचा निकटवर्तीय सतीश भोसले उर्फ खोक्या याने बेदम मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. याप्रकरणी भोसलेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सतीश भोसले याचे नवीन कारनामे समोर येत आहेत.
सतीश उर्फ खोक्या भोसले (Satish Bhosale) याने बीडच्या शिरुर परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मास खाल्ल्याचे समोर आले होते. त्यानंतर वनविभागाच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या शिरूर येथील घराचे आज वनविभागाने पोलिसांच्या (Police) मदतीने झडती घेतली आहे.
या झडतीमध्ये वनविभागाला वन्यजीवांच्या शिकारीचे मोठे घबाड सापडले आहे. यात वन्यजीवांच्या प्राण्यांच्या मांससह धारदार शस्त्र,जाळी, वाघुरसह एक जर्मनचा डब्बा आढळून आला असून या डब्यामध्ये चरबी सापडली आहे. सेच या डब्यात ४०० ते ५०० ग्राम दोन पुड्या गांजा (Ganja) आढळून आला आहे.
दरम्यान, ही कार्यवाही विभागीय अधिकारी अमोल गरकळ, वन परिक्षेत्राधिकारी श्रीकांत काळे, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रड, आष्टी वनपरिक्षेत्र विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी केली आहे. दुसरीकडे वनविभागाला उशिरा जाग आल्याने वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच आरोपींच्या (Accused) शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे बोलले जात आहे.