Thursday, September 10, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग; 'हा' बडा नेता...

Nashik BJP Politics : भाजपमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग; ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेच्या निवडणुकांत बहुमताचा जादुई आकडा पार करणाऱ्या भारतीय जनता पक्षात (BJP) आता विविध महत्त्वाच्या पदांसाठी लॉबिंगला वेग आला आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपचे यश स्वतंत्र मानले जात असून, तुलनेने शिवसेना (शिंदे गट) यांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, प्रभाग सभापती तसेच स्वीकृत सदस्य अशा विविध पदांसाठी इच्छुकांची हालचाल वाढली आहे.

- Advertisement -

प्रत्येक पदासाठी ‘आपणच प्रबळ दावेदार’ असल्याचे दाखवण्यासाठी इच्छुकांकडून विविध राजकीय क्लुप्त्यांचा वापर सुरू झाला असून, नेतेमंडळींच्या भेटीगाठी, संपर्क आणि समीकरणे यांना वेग आला आहे. प्रत्यक्षात महापौर पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याआधीच इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. शहराध्यक्षांवर वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे.

दरम्यान, येत्या (दि.२७) मंगळवारी नाशिक महापालिकेसाठी (Nashik NMC) गट नोंदणी प्रक्रिया विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात पार पडणार असल्याचे वृत्त आहे. त्या प्रक्रियेनंतर अधिकृतरीत्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया गतिमान होणार असली, तरी आतापासूनच इच्छुकांनी हालचाली सुरू केल्याने भाजपमधील अंतर्गत राजकारण पून्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत, तर दुसरीकडे पदांसाठीची चुरस या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवस नाशिकच्या राजकीय वर्तुळात निर्णायक कुरघोड्या गतिमान होणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Eknath Shinde : लंडनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा गजर! DCM शिंदेंचे फाडफाड इंग्रजीतून...

0
नवी दिल्ली | New Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ब्रिटनच्या संसदेत आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या नागरिक-केंद्री, पारदर्शक...