दिंडोरी | प्रतिनिधी
महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. खुन, अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. तसेच माझ्या ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही. रस्त्याच्या समस्या तर कायमच आहेत. त्यावर लक्ष देयला कुणाला वेळ नाही. योग्य उपचार न मिळाल्याने आमच्या गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागतो. ग्रामीण भागात मुबलक सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात गरोदर मातेची प्रसुती होण्याच्या घटना आमच्याकडं घडतांना आम्ही बघत आहोत.
निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि बेजबाबदार सरकारला माझ्या ग्रामीण भागातील महिलांच्या व्यथा समजत नाही. परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना आणली जाते. आधी महिलांना सुरक्षित करा मग लाडकी बहिण योजना राबवा. जोपर्यंत महिलांच्या व्यथा समजून घेऊन आमच्या समस्यांवर निराकरण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील बहिण सरकारची लाडकी होवूच शकत नाही अशी खोचक प्रतिक्रिया माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिंडोरी तालुक्यातील जऊळके-दिंडोरी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व बहुद्देशीय हॉल इमारत लोकार्पण सोहळा कार्यक्रमाप्रसंगी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या सौभाग्यवती व जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती ॲक्शनमोडवर आल्याने त्यांची विशेष चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा