Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला; जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

मोदी सरकारच्या चुकीमुळेच पुलवामा हल्ला; जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याबाबत (Pulwama Attack) मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्यपाल मलिक यांनी एका पोर्टलसाठी दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

भीषण अपघात! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; १३ प्रवाशांचा मृत्यू, २५ जखमी

मलिक म्हणाले की, मोदी सरकारच्या (Modi Governtment) निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाला आणि त्यात ४० जवान शहीद (Solder Martyr) झाले. हल्ला झाला त्यावेळी सीआरपीएफने जवानांना एअरलिफ्ट करण्याची मागणी केली होती. यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी करण्यात आली होती. मात्र, सीआरपीएफला (CRPF) विमाने देण्यास केंद्र सरकारने असमर्थता दर्शवली होती. जर त्यावेळी सीआरपीएफ जवानांना एअरलिफ्ट केले असते तर जवानांचे प्राण वाचले असते. तसेच जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणीही झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला.

जपानचे पंतप्रधान फुमिओ कुशीदा यांच्यावर भर सभेत जीवघेणा हल्ला

पुढे ते म्हणाले की, हल्ल्याच्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी माझ्याशी संवाद साधला. त्यावेळी मी जवानांच्या सुरक्षेतील त्रुटींची माहिती पंतप्रधान मोदींना दिली होती. मात्र त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही मला गप्प राहण्यास सांगितले. त्यांना हल्ल्याचे खापर पाकिस्तानवर फोडायचे होते आणि आगामी निवडणुकीत सरकार आणि भाजपला फायदा घ्यायचा होता, असा आरोपही मलिक यांनी केला. सत्यपाल मलिकांच्या या आरोपानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यानंतर या घटनेमुळे देशभर संतापाची लाट पसरली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या