Saturday, April 26, 2025
Homeनाशिकटी.डी.एफ. अध्यक्षपदी माजी आ.नानासाहेब बोरस्ते

टी.डी.एफ. अध्यक्षपदी माजी आ.नानासाहेब बोरस्ते

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) अध्यक्ष पदी माजी आ.नानासाहेब बोरस्ते यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

पुणे येथे राष्ट्र सेवादल कार्यालयात मावळते अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणीची बैठक आयोजित केली होती.यावेळी नविन कार्यकारीणी निवडीसह टी.डी.एफ.सभासद वाढ,कार्यकर्ते संघटनेशी बांधुन ठेवणे,संघटना मजबुत करणे यासंबंधी चर्चा झाली.

रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते बोरस्ते यांची अध्यक्ष पदाची सूचना धुळ्याचे ज्येष्ठ नेते एस.के.चौधरी यांनी मांडली त्यास नाशिक जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अनुमोदन दिले. सर्वांनी एक मताने अध्यक्षपदाला संमती दिली.मावळते अध्यक्ष बहाळकर यांनी अध्यक्षपदाची सुत्र बोरस्ते यांचेकडे सुपूर्द केली.

यावेळी बोलताना बोरस्ते म्हणाले, आज शिक्षक संघटना आणि पुरोगामी चळवळीत मोठ काम करण्याची गरज आहे.शिक्षक वर्गाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी संघटन महत्वाचे आहे. पुरोगामित्व हा लोकशाही आघाडीचा मुळ पाया आहे.टी.डी.एफ.च्या पंचसुत्रीप्रमाणे संघटना बळकटीसाठी प्रयत्न करु.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी ज्येष्ठ नेते चकोर मोहन, ई.के. कांगणे,,जे. के.थोरात,बाळासाहेब सुर्यवंशी,संदिप घोरपडे,,हिरालाल पगडाल,किशोर जाधव,संजय पवार,अरुण पवार,बाळासाहेब ढोबळे,छोटु शिरसाट, एस.के.टिळे, दत्ता आदिक,मंगेश सुर्यवंशी,संजय मगर,राजेंद्र वाघ. नंदुरबार,जी.के.थोरात पुणे,के.एच. ढोमसे पुणे,संजय पवार,पी.बी.नेरे , डी.जे.मराठे धुळे,हिरालाल पगडाल नगर,अरविंद कडलाग नगर,संदीप घोरपडे व आर.आर.पाटील जळगाव, नानासाहेब पुंदे मुंबई, निषांत रंधे यांचेसह राज्य कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

टी.डी.एफ. ही संघटना,विचार हा शिक्षक चळवळीत ताकदवान आहे. याची प्रचिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे वेळी आलेली आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकही वर्षभरात लागेल. यादृष्टीने या निवडीला महत्व असल्याचे बोलले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...