Saturday, May 25, 2024
Homeनाशिकमाजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल गावित यांचे निधन

माजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल गावित यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक – इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल रमेश गावित (वय-38) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता.12) निधन झाले.

- Advertisement -

आठवडाभरापासून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गुरूवारी (ता.13) सकाळी 11 वाजता नाशिक अमरधाम येथे अत्यंसंस्कार केले जाणार आहे.

हर्षल गावित काहीकाळ काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्यांनी महापालिकेची निवडणुक देखील लढविली होती. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगा, आई निर्मला गावित, वडील रमेश गावित, बहिण जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या