Saturday, September 21, 2024
Homeनाशिकमाजी आमदार शिवराम झोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश

माजी आमदार शिवराम झोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश

इगतपुरी । Igatpuri

- Advertisement -

इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार व भाजपचे नेते शिवराम झोले यांनी नुकतीच पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मतदार संघातच नव्हे तर जिल्ह्यात आदिवासी समाजात झोले यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विशेष महत्व आहे. शिवराम झोले यांची घरवापसी झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांच्या पुढाकारातून हा प्रवेश निश्चित झाला.

शिवराम झोले हे नाशिक जिल्ह्यात आदिवासी समाजातील प्रमुख नेते मानले जातात. आपल्या राजकीय वाटचालीत त्यांनी अनेक संस्थांवर प्रतिनिधित्व केले. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व जनतेच्या सुखदुःखात अद्यापही त्यांचा सक्रिय सहभाग असतो त्यामुळे त्याना मानणारा वर्ग व समर्थकांची संख्याही मोठी आहे.

राजकीय वाटचालीत झोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यामुळे अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीतही ते पवारांसोबतच होते. मध्यंतरीच्या काळात शिवराम झोले यांनी शिवसेना, भाजपात प्रवेश केला होता. सध्या ते भाजपात होते.

कालच झोले यांनी माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांच्यासमवेत पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत थेट प्रवेश केला. झोलेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवाशाने इगतपुरी तालुक्यातील राजकीय समीकरणे काहीशी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झोलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षासाठी ही जमेची बाजू असून त्यांच्या प्रवाशाने जिल्ह्यात व इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल असा आशावाद पालकमंत्री ना. भुजबळ यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या