Friday, November 15, 2024
Homeराजकीयभाजपचे चार सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात - दीपक पाटील

भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात – दीपक पाटील

रावेर – प्रतिनिधी Raver

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शेवटी भाजपला रामराम ठोकत आपला राजीनामा देऊन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने रावेर,मुक्ताईनगर व यावल मध्ये राजकीय भूकंप होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

यात रावेर पंचायत समितीचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी भाजपचे चार सदस्य राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची माहिती दिली आहे.

पंचायत समितीत १२ पैकी ८ भाजप,सेना व कॉंग्रेस प्रत्येकी १, राष्ट्रवादी २ अशी सद्याची स्थिती आहे.चार सदस्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला तर या ठिकाणी सत्तातर होवू शकते मात्र, पक्षाचे नेते सुरेश धनके यांनी पक्षातून कोणीही सदस्य बाहेर पडणार नसल्याचे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या