Wednesday, April 30, 2025
Homeमुख्य बातम्यादुर्दैवी : दुचाकी आणि कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

दुर्दैवी : दुचाकी आणि कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

घोटी । जाकीर शेख

इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाट्याजवळ भीषण अपघात ४ जण जागीच ठार झाले आहेत. आज दुपारी दुचाकी क्रमांक MH 15 FZ 7885 आणि स्विफ्ट कार क्रमांक M H 15 EB 7657 या वाहनांचा हा अपघात झाला.

- Advertisement -

या अपघातात दुचाकीवरील ऋषिकेश तुळशीराम आगिवले, वय २२ वर्ष, टीलू सोमनाथ आगिवले, वय २४ वर्ष, पिंटू राजेंद्र आगिवले, वय २१ राहणार भावली खुर्द, तालुका इगतपुरीयांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्वीफ्ट कारमधील वैष्णवी काशीद ह्या देखील या अपघातात जागीच मयत झाल्या आहेत.

या घटनेत गंभीर जखमी मेघा शिंदे, साहील शिंदे, भुमिका वावरे यांना एसएमबीटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर मृत झालेल्या व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातस्थळी रुग्णवाहीका चालक मुजफर रंगरेज व रुग्णवाहीका चालक नंदु जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने घोटी येथील रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल धुमसे, पोलीस हवालदार नितीन कटारे, परीक्षीत इंगळे, केशव बस्ते, सागर सौदागर, बाळु डहाळे आदी करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : परप्रांतीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar येथील एका बायपास रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत एका अल्पवयीन मुलीसोबत (वय 13) एका व्यक्तीने अश्लिल चाळे केल्याची घटना सोमवारी (28 एप्रिल) दुपारी...