Saturday, November 9, 2024
HomeनाशिकNashik Accident News : कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात ४ जण जखमी

Nashik Accident News : कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात ४ जण जखमी

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) गोंदे दुमाला येथील प्रभू ढाब्याजवळ आज सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाचे (Vehicle) टायर फुटून अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : शहरात वेगवेगळ्या भागांत पाच जणांची आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईकडून (Mumbai) नाशिकच्या (Nashik) दिशेने येत असताना वाहन क्रमांक (एमएच १५. डीएस १९५६) या कारचा (Car) टायर फुटल्याने हा भीषण अपघात होऊन सदर कार पलटी झाली. यावेळी अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी समयसुचकता दाखवत अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

हे देखील वाचा : Nashik-Dindori Loksabha 2024 : नाशिकमध्ये ३१ तर दिंडोरीत १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, या अपघातात अमित ऐनापुरे, (वय ४७) अनघा ऐनापुरे (वय ४३) अजय दत्तात्रय कुलकर्णी (वय ६३) अनिता कुलकर्णी (वय ५८) सर्व राहणार नाशिक अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार; माघार नाहीच

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या