नाशिक। प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
‘तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ मिळाले असून तुमच्या आधार कार्डवरील मोबाइल क्रमांक चुकीच्या कामासाठी वापरला जात आहे,’ असे सांगत ताेतया पाेलिसांनी शहरातील दोघांना सुमारे ३० लाखांचा गंडा घातला. यासाठी संशयितांनी दोघांना स्काईपवरून मुंबई पोलिस, सीबीआय, ईडीमधून बोलत असल्याचे भासवत घाबरवून ठेवत आणि कारवाईची धमकी देत हा गंडा घातला. शहरात अशा प्रकारच्या फसवणुका अलीकडे वाढत चालल्या आहेत.
या गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली. त्यामुळे भामट्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या बँक खात्यात दोघांनी मिळून ३० लाख ७४ हजार ८०६ रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.