धुळे । Dhule । प्रतिनिधी
गुजरात (Gujarat) राज्यातील कलेढिया (Kaledhia) येथे पोहोचविण्यासाठी दिलेली 96 क्विंटल कपाशी (96 quintal of cotton) तेथे न पोहोचविता एकाने तालुक्यातील जुनवणे येथील शेतकर्याची (farmer) फसवणूक (Fraud) केली. या कपाशीची साडे आठ लाख रूपये किंमती आहे. याप्रकरणी एकावर शिंदखेडा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
नंदुरबारात 20 नोव्हेंबरला घुमर महोत्सव
याबाबत उमेश आत्माराम पाटील (वय 45 रा.जुनवणे ता. धुळे) या शेतकर्याने तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 ते सकाळी 10 वाजेदरम्यान कृष्णा निंबा पाटील (रा. गरताड ता. धुळे) याने त्यांच्या आयशर ट्रकमध्ये (क्र. एमएच 18 बीजी 6642) उमेश पाटील यांच्या मालकीची 96 क्विंटल 80 किलो वजनाची कपाशी ही कलेढिया, गुजरात येथे पोहोचवुन देता, असे सांगून वाहनात घेवून गेला.
मात्र ही कपाशी तेथे न पोहोचविला विश्वासघात केला. त्याने ही कपाशी परस्पर कोठेतरी विक्री केल्याचा फिर्यादी यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून तपास पोहकाँ चव्हाण हे करीत आहेत.
विखरणच्या यात्रेत दोन गट परस्परांना भिडलेत