Wednesday, April 2, 2025
Homeनंदुरबारजमिन नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा पाच लाखात फसवणूक

जमिन नावावर करुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा पाच लाखात फसवणूक

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

जमिन नावावर करण्यासह नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून एकाची 5 लाख 21 हजार 43 रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी भिवंडी येथील डॉक्टराविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 21 जानेवारी 2023 ते 4 जून 2023 या कालावधीत डॉ.दीपेश मंगल भोईर (रा.भिवंडी ता.भिवंडी जि.ठाणे) याने खापर ता.अक्कलकुवा येथील रोहित सुरेश कापूरे याला प्रॉपटी वादाची जमिन नावावर करून देतो तसेच नोकरीला लावुन देतो असे आमिष दाखवून वेळोवेळी पैशांची मागणी करुन त्याच्याकडून ऑनलाईन व फोन पे द्वारे तसेच अशी एकुण 5 लाख 21 हजार 43 रुपये स्विकारुन फसवणूक केली आहे. याबाबत कापूरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420 प्रमाणे गुन्हा, दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....