Friday, May 17, 2024
Homeधुळेलेबर कॉन्ट्रॅक्टरची साडेनऊ लाखात फसवणूक, 9 जणांवर गुन्हा

लेबर कॉन्ट्रॅक्टरची साडेनऊ लाखात फसवणूक, 9 जणांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

साखर कारखान्यात मजुर पुरविणार्‍या लेबर कॉन्टॅ्रक्टरची (labor contractor) साडेनऊ लाखात फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ऊस तोडणी करणार्‍या 9 मजुरांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा (crime) नोंद झाला आहे.

- Advertisement -

याबाबत अशोक भिकन तिरमले (वय 56 रा. विखुर्ले ता.शिंदखेडा) या लेबर कॉन्ट्रॅक्टरने दोंडाईचा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, मजुरांनी त्यांच्याशी संपर्क साधून ऊस तोडणीसाठी मजुर पुरवितो, असे सांगून त्यांच्याकडून 45 हजार रूपये अ‍ॅडव्हॉन्स घेतले. त्यानंतर दोंडाईचा येथे करारनामा केला.

त्यानंतर पुन्हा भिमा मोहन भिल (वय 39 रा. अजनाड बंगला, शिरपूर) याने सोबत मजुर न आणला, त्यांची तयारी चालु आहे, असे सांगत विश्वास संपादन करून सर्वाच्यावतीने माझ्याकडे पैसे द्या, अशी मागणी केली. त्यानुसार तिरमले यांनी त्याला 9 लाख रूपये रोख देवून करारनामा लिहून घेतला.

मात्र मजुर अन्य कारखान्यावर कामास गेले. दरम्यान भिमा भिल आणि इतर मजुर साथीदारांनी कट रचून ऊस तोडणीसाठी मजुर पुरवितो, असे खोटे सांगून खोटा करारनामा करून तिरमलेय यांची 9 लाख 45 हजार रूपयात फसवणूक केली. म्हणून भिमा भिलसह लक्ष्मण गोटन भिल, सतिलाल देवा भिल, राहुल सुरसिंग मोरे, तुकाराम शामराव भिल, अजय देविदास भिल, अविनाश बाळु भिल , जितेंद्र प्रकाश भिल, मोतीलाल सुदाम भिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या