नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय लष्करातून सेवानिवृत्त (Retired ) झालेल्या ८८ वर्षीय ब्रिगेडियर महिलेच्या (Woman) घरातील धनादेश चाेरुन त्यावर तिच्या हुबेहुब खोट्या स्वाक्षरी करीत बँक खात्यावरील सव्वा कोटी रुपये एका संशयित कुटुंबाने लांबविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त ब्रिगेडिअर वृद्धेच्या शेजारी राहणाऱ्या संशयित कुटूंबियांविरोधात उपनगर पोलिसात (Upnagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Nashik News : महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले परत
याबाबत अधिक माहिती अशी की, दिशा टांक, किशोरभाई एन टांक, सरला टांक, देवांश टांक, विकास राजपाल रहतोगी अशी संशयितांची नावे आहेत. सेवानिवृत्त महिला ब्रिगेडियर विस्मस मेरी जेरेमीह (८८, रा. मिहिर को ऑप. सोसायटी, दत्त मंदिर रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे नाशिकरोड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या शाखांमध्ये खाते आहेत. विस्मस यांचा भाचा ॲन्सले हा घरी आला असता, त्यावेळी त्याने विस्मस यांच्याकडील कागदपत्रे, धनादेश (Check) पडताळून पाहिले.
हे देखील वाचा : नाशिक जिल्हा झाला १५५ वर्षांचा; गौरवशाली क्षणांचा प्रशासनाला पडला विसर
त्यावेळी त्यांना धनादेश (चेकबुक) पुस्तकातील ३८ धनादेश गायब असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात अन्सले याने विस्मस यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या बँकांमध्ये त्यांच्या बचतीच्या रकमा, म्युच्युअल फंड, एफडी असल्याचे सांगितले. तसेच या बँकांमध्ये त्यांची दरमहा पेन्शन जमा होते व एफडीच्या माध्यमातून व्याजाची रक्कमही जमा होते व चेकबाबत काही माहित नाही असे सांगितले. दरम्यान, संशयित दिशा हिने विस्मस यांच्या वृद्धापकाळाचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक (Fraud) केली आहे, असे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे करीत आहेत.
हे देखील वाचा : विद्यार्थ्यांचा भरपावसात जीवघेणा प्रवास
असे काढले पैसे
प्रकरण उघडकीस आल्यानंतर, बँकेकडे चौकशी व शहनिशा केली असता संशयित दिशा टांक हिने विस्मस यांच्याकडे येणे-जाणे असल्याने तिनेच विस्मस यांच्या बँकेच्या धनादेशाची चोरी केल्याचे उघड हाेत आहे. त्यानंतर विस्मस यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या चेकवर करीत त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम, एफडी मोडून त्यावरील व्याज रक्कम, म्युच्युअल फंडच्या रकमा असे १ कोटी २३ लाख ८५ हजार ३६७ रुपये तिने तिच्या कुटूंबिय व मित्रांच्या बँक खात्यावर परस्पर वर्ग केल्याचे दिसून आले आहे. विशेषत: विस्मस या जयराम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाही संशयित दिशा हिने त्यांच्या बँक खात्याचा वापर करुन रकमा काढल्याचे समोर आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा