Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारग्राहकाला ८५ हजाराची भरपाई देण्याचे आदेश

ग्राहकाला ८५ हजाराची भरपाई देण्याचे आदेश

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

बायजूस कंपनीने (Baijus Company) लर्निंग ॲपसाठी (Learning App) विद्यार्थ्यांना दिलेले दोन टॅब सुरुच झाले नसल्याने संबंधीत विद्यार्थ्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी ग्राहक आयोगाकडे तक्रार देण्यात आली असता ग्राहकाला बायजूस कंपनीने ५५ हजार ५८४ रुपये, शारीरिक व मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये व तक्रारी अर्जाचे ५ हजार रुपये असे एकुण ८५ हजार ५८४ रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

- Advertisement -

नंदुरबार (nandurbar) येथील विशाल मनोहरलाल शाह यांनी आपला मुलगा तसेच पुतण्यासाठी दि. ९ सप्टेंबर २०१९ रोजी Think Learn Pvt. Ltd. (BYJU’s) पुणे यांच्याकडून इयत्ता ७ वी ते १० वी करिता दोन लर्निंग ऍप घेतले.

त्याकरीता ठरल्याप्रमाणे रक्कम अदा केली. BYJU’s ने विशाल शाह यांना कुरिअरव्दारे कंपनीचे लर्निंग ऍप असलेले दोन टॅब पाठविले. त्यांच्या मुलांनी अभ्यासाकरीता ऍप सुरु करण्याचा प्रयत्न केला परंतू अनेक कारणांमुळे ते सुरु होऊ शकले नाही.

तेव्हा त्यांनी कंपनीच्या टोल फ्री नंबर तसेच अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तेथून कोणतीही सेवा देण्यात आली नाही व त्यामुळे मुले लर्निंग ऍपचा त्यांच्या शिक्षणाकरीता वापर करु शकली नाही. बायजूस कंपनीने आश्वासित केल्याप्रमाणे कुठलीही सेवा न पुरविल्याने विशाल शाह यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग नंदुरबार येथे तक्रार दाखल केली होती.

त्यात आयोगाने तक्रारदाराचा अर्ज, त्यातील म्हणणे, संबंधीत कागदपत्र, शपथपत्र या बाबींचे अवलोकन करुन अध्यक्ष एस.पी.बोरवाल, सदस्या श्रीमती बी.पी.केतकर, सदस्य मोहन बोडस यांनी BYJU’s कंपनीने ग्राहकाला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे,

असा निष्कर्ष काढून BYJU’s कंपनीने तक्रारदारांना ५५ हजार ५८४ रुपये तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी २५ हजार व तक्रार अर्जाचा ५ हजार रुपये देण्याचा आदेश पारित केला. तक्रारदाराच्या वतीने ऍड.एन.बी.देसाई यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या