Friday, April 25, 2025
Homeक्राईमचेष्टामस्करीच्या वादातून मित्राचा कात्रीने भोकसून खून

चेष्टामस्करीच्या वादातून मित्राचा कात्रीने भोकसून खून

मुकुंदनगर मधील घटना || खून करणार्‍याला पुण्यातून घेतले ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मुकुंदनगर भागात जिलानी मेडिकल जवळ शुक्रवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी मित्रांमध्ये चेष्टामस्करीतून झालेल्या वादात एकाने युवकाला कात्रीने पाठीत भोसकले. यात जखमी युवकाचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. जिशान रूस्तमअली खान (वय 18, रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मयत जिशानचा भाऊ नसीबअली रूस्तमअली खान (वय 25 रा. घर नं. 23, इस्लामी बेकरीजवळ, दर्गा दायरा रस्ता, शहाजीनगर, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने काल, शनिवारी दुपारी पुण्यातून ताब्यात घेतल्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सांगितले. जिशान रूस्तम अली खान, शमशुद्दीन निजामुद्दीन खान, रेहान अब्दुलहक शेख, फैजान सोहराबअली खान हे चौघे मित्र एकमेकांची चेष्टामस्करी करत असताना शमशुद्दीन निजामुद्दीन खान यास राग आल्याने त्याने मेडिकलमधील काऊंटरवरील कात्री घेऊन जिशान रूस्तमअली खान याच्या पाठीत भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार संशयित आरोपीच्या शोधासाठी पुण्याला पथक रवाना करण्यात आले. पथकाने शनिवारी सायंकाळी संशयित आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुलगीर करत आहेत.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...