Friday, May 3, 2024
Homeधुळेदिल्लीतून मुंबईत जाणारा सव्वा कोटींचा पानमसाला जप्त

दिल्लीतून मुंबईत जाणारा सव्वा कोटींचा पानमसाला जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

दिल्ली (Delhi) येथून मुंबईला (Mumbai) अवैधपणे होणारी गुटख्याची तस्करी (Gutkha smuggling) स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने रोखली. आज सकाळी पुरमेपाडा शिवारात चार कंटेनरला (Container) पकडण्यात आले. त्यातून तब्बल सव्वा कोटींचा सुगंधीत पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसात (polic) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत (Restricte) असलेला गुटखा (Gutkha) दिल्ली येथून भरुन मुंबई शहरात विक्री करण्याचे उद्देशाने चार कंटेनरमधून वाहतुक करुन हेंद्रूण-मोघण, मालेगावमार्गे मुंबई येथे जात असल्याची गोपनिय माहिती आज एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत (Police Inspector Shivaji Budhwant) यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला त्या कंटेनर वाहनाचा शोध घेवुन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथक वाहनाचां शोध घेत आर्वी गावाचे पुढे पुरमेपाडा गावाजवळ आले. तेव्हा चार कंटेनर एका मागे एक जात असल्याचे दिसल्याने पथकाने चारही कंटेनरला(Container) थांबविले. त्यावरील वाहन चालकांना त्यांचे नाव, गाव विचारता त्यांनी साबिर मजिद खान (रा. ग्राम घासेरा तहसिल-जि. नुहू, हरीयाणा), शकील अहमद लियाकत अली (रा. ग्राम भडंगाका तहसिल जि.नुहू), रुकमोद्यीन अयुब खान (रा. ग्राम हिरवाडी तहसिल फिरोजपुर झिरका, जि. नुहू), मुरसलिम रुजदार (रा. ग्राम सोमकी तहसिल नगर जि.भरतपुर) व नसिम खान अली मोहम्मद खान (रा. ग्राम अलीगड गुंडवास तहसिल-जि. पलवल) असे सांगितले. त्यांना कंटेनरमधील मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना कंटेनरसह मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात आणले.

कंटनेरची (Container) तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा (Gutkha) मिळुन आला. 1 कोटी 30लाख 49 हजार 280 रूपये किंमतीचा फोर के स्टार व एसएचके सुंगधीत पानमसाला तंबाखु, 60 लाखांचे चार कंटेनर (क्र. एन.एल. 01 अ.सी. 8097, एच.आर. 55 ओ.ई. 3977, एच.आर. 38 डब्ल्यु 3283 व एच.आर. 38 वाय 9640) व 25 हजारांचे 5 मोबाईल असा एकुण 1 कोटी 90 लाख 74 हजार 280 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वरील पाचही जणांविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात पोना गौतम सपकाळे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ रफिक पटाण, पोना गौतम सपकाळे, पोना राहुल सानप, प्रकाश सोनार, संदीप सरग, कैलास महाजन, संजय सुरसे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या