Friday, May 3, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

31 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनाच्या पूर्वार्धात पुष्कळ अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण नातेवाईक, कुटूंबातील माणसे किंवा सासरवाडीकडील लोक यांच्याकडून त्रास संभवतो. विचार परंपरेला न जुळणारे असतील. स्वतंत्र बाण्यामुळे कार्यावर टिका होण्याची शक्यता आहे. शहाणपणा व दुसर्‍यावर विश्वास न ठेवण्याची वृत्ती आर्थिक परिस्थितीचे संरक्षण करतील. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग.

- Advertisement -

1 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तुमचे विशेष गुण बालपणीच प्रकट होऊ लागतील. महत्त्वाकांक्षा स्पष्ट असेल. उच्च दर्जा प्राप्त कराल. एकट्याने केलेल्या कामात जास्त यश मिळेल. आर्थिक बाबतीत बराच चढउतार असेल. त्वरीत निर्णय घेऊन कृती करण्याचा उतावळेपणा करणे टाळा.

2 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमच्या स्वभावात नेहमी द्वैत राहील. कधी कधी निश्चयी असल्यासारखे वागाल तर कधी लोण्याप्रमाणे मऊ असाल. उद्योगात वारंवार बदल केल्यास नुकसान संभवते. आर्थिक बाबतीत उद्योगाची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवल्यास उत्तम यश मिळेल. कलावंत, लेखकांना पैशांसोबत किर्तीही प्राप्त होऊ शकेल.

3 एप्रिल -वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रमुखपद भूषवण्यात यश मिळेल. मते फार पक्की व हुकूमशाही वृत्ती राहील. हाताखालील लोकांशी कडक व्यवहार राहील. शत्रु सामर्थ्यवान असतील. त्यांना परास्त करण्यासाठी तोलामोलाचे मित्र तयार करा. उपकार न घेण्याविषयी जागरूक रहाल.

4 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी असेल की, जीवनात बराच विरोधाभास राहील. काही काळ यशाचा राहिल तर याउलटही परिस्थिती राहील. घडणार्‍या घटनांमध्ये अकल्पितपणा राहील. न होणार्‍या गोष्टी घडून जातील. मानसिक स्थिती सदैव बेचैन राहील. आर्थिक बाबतीत एकट्याने उलाढाल करा आर्थिक बाबतीत प्रचंड यश मिळेल.

5 एप्रिल- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. मन व बुद्धी सर्वांगीण विकसीत असल्याने कोणत्याही विषयाचा ध्यास घेतल्यास त्यात प्राविण्य मिळेल. वाणी व लेखनीद्वारे कोणालाही सहजपणे मुद्दा पटवून शकाल. आर्थिक बाबतीत ठरवाल ते लक्ष्य गाठू शकाल. पण अर्थापेक्षा स्वतःच्या कार्यावर तुमचे लक्ष्य जास्त प्रमाणात केंद्रीत कराल.

6 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. मंगळाच्या प्रभावामुळे उत्साह व शारीरिक शक्ती चांगली राहील. औदार्याला त्याचा उपयोग होईल. समाजात लोकप्रिय व्हाल. इतरांच्या मदतीला धावून जाल कारण इतरांबद्दल सहानुभूती वाटते. राहणात व निवासस्थानात डामडौल याचा सुरेख संगम झालेला आहे. पैशाच्या बाबतीत आयुष्याच्या सुरूवातीला भाग्यवान असाल. पण वृद्धापकाळात त्रासाची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या