Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय'ब्रेड मिळत नाही तर केक खा'; इंधन दरवाढीवरुन रोहित पवारांची खोचक टीका

‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’; इंधन दरवाढीवरुन रोहित पवारांची खोचक टीका

मुंबई l Mumbai

देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेली जनता सततच्या इंधन दरवाढीमुळे आणखी त्रस्त झाली आहे. सततच्या महागाईमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.

- Advertisement -

परंतु, एकीकडे या किमती गगनाला भिडलेल्या असताना त्याच गगनातून भरारी मारणाऱ्या विमानाच्या जेट इंधनाची किंमत खूप कमी आहे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर खोचक शब्दात टीका केली आहे.

“विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. त्यामुळे ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’ असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली! आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा’, असं भाजपाच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!” अशी खोचक रोहित पवार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या