Sunday, January 25, 2026
HomeनगरAhilyanagar : निधी अथवा हमी देणार्‍यांनाच गाळप परवाना

Ahilyanagar : निधी अथवा हमी देणार्‍यांनाच गाळप परवाना

अवघ्या चार साखर कारखान्यांकडून परवाना अर्ज सादर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

यंदाच्या गाळप हंगामाच्या तोंडावरच राज्य सरकारने साखर कारखान्यांवर मुख्यमंत्री फंड, पूरग्रस्त निधी, गोपीनाथ मुंंडे सहाय्यता निधी व साखर संकूल निधीच्या कपातीचा बडगा उगारला. मागील वर्षी 2024-25 मध्ये गाळप झालेल्या उसावर ही कपात लावण्यात आलेली आहे. कपातीची रक्कम अथवा या रक्कमेचे हमीपत्र भरून देणार्‍या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार आहे. शनिवार (दि.1) पर्यंत नगर जिल्ह्यातून अवघ्या चार साखर कारखान्यांनी याबाबत हमीपत्र भरून गाळप परवान्यांसाठी अर्ज केला असल्याची माहिती प्रादेशिक उपसंचालक साखर (नगर) यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

नगर जिल्हा हा साखर कारखानदारीचा जिल्हा असून जिल्ह्यात 10 खासगी तर 14 सहकारी तत्वावरील साखर कारखाने आहेत. यंदा जिल्ह्यात आणि राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून यात जिल्ह्यातील ऊस उत्पादक बाधलेला असून त्यांना मदत देण्याऐवजी राज्य सरकारने सरकट सर्व साखर कारखान्यांवर मुख्यमंत्री फंड, पूरग्रस्त निधी, गोपिनाथ मुंंडे साहय्यता निधी व साखर संकूल निधीची कपातीचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला असल्याने कपात करण्यात येणारी ही रक्कम प्रत्येक कारखान्यांना त्यांच्या मागील वर्षीच्या गाळपानुसार भरावीच लागणार आहे.

YouTube video player

ही कपात न भरणार्‍या अथवा त्याबाबतचे हमीपत्र न देणार्‍या साखर कारखान्यांना गाळप परवाना न देणार्‍या कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे हंगाम सुरू झाल्यावर देखील नगर जिल्ह्यातील अथवा विभागातील एकाही कारखान्यांना गाळप परवाना मंजूर झाला नसल्याचे प्रादेशिक उपसंचालक साखर (नगर) यांच्या कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, शनिवारपर्यंत अवघ्या चार कारखान्यांचे परवान्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज आलेले असून ते साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे.

उर्वरितपैकी राहुरीचा तनपुरे आणि श्रीगोंद्याचा कुकडी साखर कारखाना व पियुष साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने यंदा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षीच्या गाळपानंतर नगर आणि नाशिक जिल्ह्यातील 26 साखर कारखान्यांपैकी 22 साखर कारखान्यांनी एफआरपीच्या 100 टक्के रक्कमा शेतकर्‍यांना अदा केलेल्या आहेत. तर उर्वरित चार कारखान्यांच्या अंशत: एफआरपी अदा करणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.

कपातीतून कोट्यवधी निधी
यंदा एकट्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून वेगवेगळ्या कपातीतून 18 ते 20 कोटी रुपयांचा निधी उभा राहण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात 24 पैकी 20 साखर कारखान्यांकडून प्रत्येकी 80 लाख ते 1 कोटीपर्यंत मुख्यमंत्री फंड, पूरग्रस्त निधी, गोपीनाथ मुंंडे सहाय्यता निधी व साखर संकूल निधीच्या कपतीची रक्कम उपलब्ध होणार आहे. यामुळे एकट्या नगर जिल्ह्यातून सरकारकडे 20 कोटींपर्यंतची रक्कम उभी राहणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच; वाहतुकीवर परिणाम होण्याची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून किसानसभेच्या (Kisaan Sabha) वतीने काढण्यात आलेला शेतकरी मोर्चा आज नाशिकमधून मुंबईच्या (Nashik to Mumbai)...