Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : निधी आणला मग जनतेला लाभ कसा झाला नाही?

Nashik Political : निधी आणला मग जनतेला लाभ कसा झाला नाही?

समीर भुजबळ यांचा परखड प्रश्न

नांदगाव ।

शासकीय योजनेद्वारे निधी आणला गेला पण तळागाळातील जनतेपर्यंत तो पोहचलाच नाही, विकासकामेही झाली नाहीत. हा असा विकास तुम्हाला हवा आहे का? असे लोकप्रतिनिधी काय कामाचे? दमबाजी आणि दगाबाजीत पाच वर्षे घालवणार्‍या तसेच दडपशाही आणि झुंडशाहीला प्राधान्य देणारे तुम्हाला हवे आहेत की विकास करणारे, असा प्रश्न अपक्ष आमदार समीर भुजबळ यांनी निमगाव गटात उपस्थित केला.

- Advertisement -

यावेळी सर्वांनी एकमुखाने सांगितले की, आम्हाला विकास हवा आहे. त्यांचा हा प्रतिसाद पाहून भुजबळ म्हणाले की, अनेक गावांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, सिंचनाचे पाणी, शाळा, आदिवासी पाडे, शौचालय अशा पायाबूत समस्या आहेत. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर सरकारी योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास करता येतो. येवला-लासलगाव मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून विकासपर्व सुरू आहे. पंकज भुजबळ यांनी दहा वर्षांच्या काळात नांदगाव मतदारसंघात असंख्य विकासकामे केली. आता पुन्हा भुजबळ पॅटर्न राबविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे. यावेळी संधी दवडू नका. तुम्हाला माझ्यासाठी फक्त एकदाच निर्णय घ्यायचा आहे.

पुढील पाच वर्षे मी आपल्यासाठी विविध निर्णय घेणार आहे. म्हणूनच आपण सर्वांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रावरील शिट्टी या निशाणी शेजारील बटण दाबून मला विजयी करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.ङ्गङ्गसभेला प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे भुजबळ यांना दाद दिली. तसेच, त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी दीपक अहिरे, शेखर पगार, पंकज शेवाळे, समाधान दैतकार, विनोद शेलार, राजाभाऊ खेमनार, नवनाथ शिल्लक, ज्ञानेश्वर हिरे, अमोल झाडगे, आप्पा कुंडगर आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या