Monday, May 6, 2024
HomeUncategorizedभविष्यातील वाहनांनी जीवन सुकर

भविष्यातील वाहनांनी जीवन सुकर

दुष्यंत वाडीवकर

ज्या ठिकाणी वाहन स्वत:हून जाउ शकत नाही अशा ठिकाणी मानवी वाहन चालकास हे तंत्रज्ञान मदत करेल आणि मानवी चुकी मुळे होणारे अपघात नाहीसे होतील. ही वाहने रस्त्यात येणारे खड्डे किवा गतिरोधक आधीच पहातील व सस्पेंशन आणि वेग यांचे नियंत्रण करीत प्रवास बिनधक्याचा व सुखदायी करतील. वाहतूक ध्वनिप्रदुषण आपोआप खूपच कमी होइल.

- Advertisement -

पंचवीस वर्षांनंतर येणार्या वाहनांचा वेध घेण्यापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी नाशिक मध्ये काय परिस्थिती होती याचाही विचार महत्वाचा वाटतो. माझा जन्म नाशिकचा.माझ्या या आवडत्या सुंदर शहरातच मी मोठा झालो.

1995 मध्ये माझ्या वडिलांच्या मारुती सुझुकी 800 मधून आम्ही शहरभर भटकत असू. पूर्वी त्याकाळी ज्या गाड्यांचा मला ध्यास होता त्या फेरारी सारख्या गाड्या नाशिकमध्ये मला कुठेच दिसत नव्हत्या.

त्या काळी कांही निवडक प्रतिष्ठीत लोकच फक्त अशी ही अद्यावत वाहने आयात करू शकत असत. पण माझ्या मागील भेटीत मी जेव्हा नाशिकला होतो तेव्हा मी अगदी नवीन, आधुनिक अशा मर्सिडीझ बेंझ आणि बीएमडब्ल्यू गाड्या कॉलेज रोडवर मुक्त फिरतांना पाहिल्या. मला असे नक्की वाटते की, भविष्यात भारतीयांकडे अगदी आधुनिक आणि अद्यावत असे तंत्रज्ञान ऊपल्ब्ध असेल. येणार्या भविष्यात भारतीय कंपन्या, महिंन्द्र आणि टाटा मोटर्स वगैरे कंपन्या या तंत्रज्ञानांत मोठी उड्डाणे करतील आणि या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांच्या ऊत्पादनात करतील.

मुख्य तंत्रप्रवाह भविष्याचे एक निश्चित असे चित्र दाखवितात. त्याचा विचार करता, भविष्यात येणार्या वाहनांमध्ये खालील प्रमुख बाबी असतील1. भविष्यातील मोटार वाहने एकमेकांशी संपर्क ठेवतील. जसा मानव आपापसात संपर्क ठेवतो.2. विजेवर चालणारी वाहने हा एक अपरिहार्य असा पर्याय असेल.3. नवीन येणारी वाहने त्यांच्या किंमती पेक्षा त्यांच्यातील वैशिष्टयामुळे व तंत्रज्ञानामुळे जास्त वेगळी असतील.

भविष्यातील वाहने त्यांची स्वत:ची बुद्धी (आर्टीफिशीयल इंटलिजन्स) व अचूक निर्णयशक्ती घेउन येतील व ही वाहने मानवी चालकांपेक्षा योग्य ती कार्यवाही करतील.हे नवीन तंत्रप्रवाह असे दर्शवितात की भविष्यातील वाहने ज्ञानवंत असतील आणि ही वहाने वाहनचालकाच्या हस्तक्षेपाशिवाय उत्कृष्टपणे व सुरक्षित चालतील.

ही वाहने विजेवर चालणारी असतील. प्रचलित वाहनांपेक्षा अगदी वेगळी असतील व वेगळी दिसतील. त्यांच्या बाह्य आवरणाखाली अनेक प्रगत असे सेन्सर्स जसे कॅमेरा, रडार, प्रॉक्सिमिटी सेन्सर्स वगैरे उपकरणे असतील.

ही वाहने म्हणजे चार चाकावर बसविलेला एक प्रभावी संगणकच – काँम्प्युटरच असेल. गाडीचा अंतरभागही निराळा असेल.गाडीतील बैठका स्वत:भोवती फिरू शकतील व प्रवासी समोरा समोर बसूनबोलू शकतील.

गाडी सुरू केल्यावर संगणक गाडीचा ताबा घेईल व गाडीचे सुकाणू-स्टीअरींग घडी होउन बाजूला ठेवले जाईल. गाडीच्या खिडक्या पूर्णपणे बंद होऊ शकतील आणि बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवण्याची गरज रहाणार नाही. गाडीत लोक निवांत झोपू शकतील, लॅपटापवर काम करू शकतील किवा मोबाइलवर गप्पा, इंटरनेट ईत्यादि गोष्टीही करता येतील.

तुमचे वाहन इतर वाहनांशी संपर्क ठेवून असेल व वाहतूक सिग्नलशी संपर्क ठेऊन मुंग्या प्रमाणे एकमेकांशी संदेशांची देवाण घेवाण करत कमीतकमी अडथळ्यांचा मार्ग शोधत मार्गक्रमण करतील.

ज्या ठिकाणी वाहन स्वत:हून जाउ शकत नाही अशा ठिकाणी मानवी वाहन चालकास हे तंत्रज्ञान मदत करेल आणि मानवी चुकी मुळे होणारे अपघात नाहीसे होतील. ही वाहने रस्त्यात येणारे खड्डे किवा गतिरोधक आघीच पहातील व सस्पेंशन आणि वेग यांचे नियंत्रण करीत प्रवास बिनधक्याचा व सुखदायी करतील.

विजेवर चालणार्या वाहनांचा आवाज नसतो त्यामुळे ध्वनिप्रदुषण आपोआप खूपच कमी होइल. जशी वाहने तंत्र ज्ञानात प्रगति करतील तसे रस्ते, सिग्नल्स, वाहतूक शिस्त अशा ईतर ही सुधारणा होत रहातील.

पण वाहतूक खोळंबा अधिकच वाढला तर कांही वाहने बसल्याजागी ऊडू शकतील आणि आपण बिनाअडथळ्यांचे जाऊ शकू.मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे, यातील कांही तंत्रज्ञानावर मी प्रत्यक्षात काम करत आहे.

पण वाहने स्वत: चालविण्याचा आनंद घेणारा मी व माझ्यासारखे अनेक लोक यांच्यासाठी भविष्यात गाडी चालविणे हे घोडेस्वारीच्या छंदासारखेच होईल.पुढच्या पिढीला अधिक सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहने मिळण्याचा हक्कच आहे आणि आपले तल्लख बुद्धीचे भावी इंजिनीयर आपल्याला त्या भविष्यातील वाहनांप्रत घेऊन जातीलच.

- Advertisment -

ताज्या बातम्या