Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : पत्र्याच्या शेडमध्ये 20 जुगारी पकडले

Crime News : पत्र्याच्या शेडमध्ये 20 जुगारी पकडले

डिवायएसपींच्या पथकाची कोठला भागात धाड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे हे पथकासह रात्री आस्थापना बंद करत असताना शहरातील कोठला परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुमारे एक लाख 30 हजार 300 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिरट नावाच्या हार-जीताच्या जुगारात सहभागी असलेल्या 20 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अबिद रशिद बागवान, असद गफार शेख, गफार वजीर शेख (तिघे रा. मुकुंदनगर), सलमान महेबुब शेख, सोयल जैनु सय्यद, अमीर शेख सलीम (तिघे रा. घासगल्ली), शारूख रौफ कुरेशी, सौफियान रौफ कुरेशी (दोघे रा. फलटण चौकी), जमीर अब्दुल सय्यद, नदिम रियाज शेख, प्रकाश राजु घोरपडे, प्रकाश राजु लोखंडे (सर्व रा. घासगल्ली, कोठला) आरबाज खलील शेख, इरफान युसुफ पठाण (दोघे रा. कोठला चौक), अनिल भाउसाहेब खैरे, (रा. श्रमिकनगर, सावेडी), दीपक बाबु वाघमारे (रा. रामवाडी), विलास पदमाकर वराडे (रा. भिंगार), सलाउद्दीन सफरअली शेख (रा. सैनिकनगर, भिंगार), विष्णू धोंडीबा काळे (रा. संघर्ष चौक, सावेडी गाव), अन्सार गफूर शेख (रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

YouTube video player

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे, अंमलदार गणेश चव्हाण, सचिन मिरपगार, सुजय हिवाळे, इनामदार, रमेश शिंदे, कदम यांच्या पथकाने कोठला येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये केली आहे.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...