Tuesday, April 29, 2025
Homeक्राईमकामगारांच्या वेषात जाऊन पोलिसांनी जुगारी पकडले

कामगारांच्या वेषात जाऊन पोलिसांनी जुगारी पकडले

झाडाखालचा डाव कोतवाली पोलिसांनी मोडला || 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कामगार असल्याचे भासवून पिकअपमधून गेलेल्या कोतवाली पोलिसांनी फुलसौंदर मळ्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान नऊ जुगारी पकडले असून त्यांच्याकडून रोकड, दुचाकी व चारचाकी वाहने, जुगाराचे साहित्य असा एकूण 18 लाख 42 हजार 650 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भूषण बाबासाहेब बोरूडे (वय 28 रा. बोरूडे मळा), प्रशांत गिरीष कसबे (वय 34 रा. सारसनगर), अनिल कारभारी साबळे (वय 49 रा. बुरूडगाव), राजेंद्र पांडुरंग शिंदे (वय 25 रा. एकता कॉलनी, केडगाव), किरण पांडुरंग सिदोरे (वय 40 रा. बोरूडे मळा), विशाल शांतिलाल गांधी (वय 38 रा. कायनेटीक चौक), भाऊसाहेब रामभाऊ भोसले (वय 55 रा. बुरूडगाव), शेख सलमान बशिर (वय 33 रा. विनायकनगर) व राधाकिसन पांडुरंग फुंदे (वय 39 रा. नारायणडोह ता. नगर) अशी पकडलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

- Advertisement -

त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुरूडगाव रस्त्यावरील फुलसौंदर मळ्यात लिंबाच्या झाडाखाली तिरट जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल दळवी, संगीता बडे, दीपक रोहोकले, सुजय हिवाळे, सत्यम शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, अनुप झाडबुके, अतुल काजळे, सचिन लोळगे यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने रविवारी (4 ऑगस्ट) सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी कामगार असल्याचे भासवून पिकअप वाहनातून गेले व त्यांनी छापा टाकून नऊ जणांना पकडले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांना आता खाकी गणवेश

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास मान्यता देण्यात आली आहे. या गणवेशात टोपी निळ्या रंगाची असून त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाची...