Monday, July 15, 2024
Homeनगरतोफखाना पोलिसांची जुगार, हातभट्टीवर कारवाई

तोफखाना पोलिसांची जुगार, हातभट्टीवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

तोफखाना पोलिसांनी हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी रात्री त्यांनी हातभट्टी दारू व जुगारावर कारवाई केली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैदूवाडी परिसरात एक इसम हातभट्टीची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार प्रदीप बडे, दीपक बडे, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, दत्तात्रय कोतकर, वसिमखान पठाण, संदीप धामणे, सचिन जगताप यांना कारवाईचे आदेश दिले. पथकाने रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास नमूद ठिकाणी कारवाई केली असता आशिष साहिबा लोखंडे (वय 19 रा. वैदूवाडी) हा हातभट्टी दारूची विक्री करत असताना मिळून आला. त्याच्याकडून पाच हजार 500 रूपये किमतीची 50 लीटर दारू जप्त केली आहे.

बोल्हेगाव उपनगरातील दोस्ती हॉटेलच्या समोर पत्र्याच्या टपरीमध्ये सूर्यकांत बन्सी क्षीरसागर (वय 55 रा. बोल्हेगाव) हा कागदाच्या चिठ्ठ्यांवर आकडे लिहून कल्याण मटका हारजितीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला. क्षीरसागर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून 920 रुपये जप्त केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या